जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.
पाकिस्तान क्रिकेट सुद्धा भारताच्या रडारवर असून भारतात पाकिस्तान सुपर लीगचं स्ट्रीमिंग सुद्धा बंद झालंय. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या युट्युब चॅनलवर सुद्धा भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पाकिस्तानचे क्रिकेटर्स, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या जवळपास प्रत्येक प्रसिद्ध व्यक्ती आणि इन्फ्लुएन्सरचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बॅन करण्यात आले आहेत. यातून पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटर्सना सुद्धा सूट देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानचे स्टार क्रिकेटर्स बाबर आजम, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद रिजवान सहित सर्वच पाकिस्तानी खेळाडूंचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात बॅन करण्यात आलंय. त्यामुळे पाकिस्तानवर एकावर एक डिजिटल स्ट्राईक केली जातेय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर मोठा परिणाम होणार आहे.