मोठी बातमी समोर येत आहे. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाकडून सर्वच राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येत्या सात मे रोजी मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाकडून येत्या सात मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यावेळी हवाई हल्ला होतो, त्याची सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात.
या सर्व यंत्रणांची सुसज्जता तपासण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आदेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.