आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी करण्यास तयार असल्याचा दावा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट केली आहे. रात्री उशिरापर्यंत केलेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यावर सहमती झाली आहे. याबाबतची घोषणा करताना आनंद होत आहे, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. त्याचवेळी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर दीर्घ चर्चा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यावर सहमती दर्शवली आहे. मला ही घोषणा करताना आनंद होत आहे, असेही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले.