भारताने ज्या देशाला केली मदत त्यानेच पाकच्या मदतीला पाठवले ड्रोन्स ; वाचा
भारताने ज्या देशाला केली मदत त्यानेच पाकच्या मदतीला पाठवले ड्रोन्स ; वाचा
img
Dipali Ghadwaje
भारत आणि पाकिस्तानदरम्यान मागील काही दिवसांपासून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. पहलगाममध्ये 26 पर्यटकांची हत्या घडवून आणणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी 7 मेच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारतीय सीमेला लागून असलेल्या भारतातील राज्यांमधील शहरांवर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात एकही हल्ला यशस्वी झालेला नसला तरी पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन हे त्यांना त्यांचा मित्र देश असलेल्या तुर्कीएने दिले आहेत.

दरम्यान 2023 साली तुर्कीएला जेव्हा भीषण भूकंपाचा धक्का बसला होता त्यावेळी तुर्कीएमध्ये मदतीसाठी पोहचलेला पाहिला देश भारतच होता.  तुर्कीने या मदतीची जाण न राखता आता पाकिस्तानला मदत केल्याचं पाहायला मिळत आहे. 

2023 साली तुर्कीएला जेव्हा भीषण भूकंपाचा धक्का बसला होता,  त्यावेळी भारताने ऑपरेशन दोस्तअंतर्गत तुर्कीएच्या अंकारा शहरामध्ये एनडीआरएफच्या जवानांसहीत मदतीचं साहित्य पाठवलं होतं. भारताने पडझड झालेल्या इमारतींचे ढीगारे आणि शहरांची पहाणी करण्यासाठी गरुड एरोस्पेस ड्रोन्सही तुर्कीएच्या मदतीला पाठवलेले. मात्र तुर्कीने या मदतीची जाण न राखता आता पाकिस्तानला मदत केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अनेक भारतीयांनी तुर्कीएला याच मदतीची आठवण करुन देत यापुढे तुर्कीएला कोणत्याही प्रकारची मदत भारताने करु नये अशी मागणी सोशल मीडियावरुन केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group