किश्तवाड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक , लष्कराचे ७ जवान जखमी
किश्तवाड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक , लष्कराचे ७ जवान जखमी
img
वैष्णवी सांगळे
लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंहपोरा परिसरात रविवारपासून भीषण चकमक सुरू आहे. या परिसरात तीन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली . याचदरम्यान, जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. 

त्यानंतर चकमकीस सुरुवात झाली. येथील प्रतिकूल भौगोलिक  परिस्थितीमुळे सुरक्षा दलांसमोरील आव्हान वाढले आहे. मात्र सुरक्षा दलांनी परिसराला चौफेर घेराव घालून, दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. दोन्ही बाजूंनी सातत्याने गोळीबार होत असून या चकमकीमध्ये लष्कराचे  ७ जवान जखमी झाले आहे. त्यांच्यावर उधमपूर येथे उपचार सुरू आहेत.

या चकमकीच्या पार्श्वभूमीवर किश्तवाड जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group