जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला दणका देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं.
या दरम्यान, भारतानं पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातली होती. मात्र, आता ती बंदी उठवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे न्यूज चॅनल आणि सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट्स आता पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत.