मोठी बातमी : पाकिस्तानी अभिनेता फवादच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर केंद्रानं लादली बंदी
मोठी बातमी : पाकिस्तानी अभिनेता फवादच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर केंद्रानं लादली बंदी
img
Dipali Ghadwaje
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही.

हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. या नरसंहारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झालेत.

आरती एस बागडी दिग्दर्शित या चित्रपटात खानच्या कास्टिंगमुळे वाद निर्माण झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी चित्रपट अबीर गुलालला खूप विरोध झाला आहे.

सोशल मीडियावर लोक चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. आता सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार नाही.

पहलगाम हल्ल्यानंतर जनतेच्या संतापामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.  

 या चित्रपटात वाणी कपूर, सोनी राजदान आणि रिद्धी डोगरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 
  
  
  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group