पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन , बिग बींची
पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन , बिग बींची "ती" पोस्ट होतेय व्हायरल
img
Dipali Ghadwaje
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना लक्ष्य केलं. त्यानंतर 23 एप्रिलपासून अभिनेते अमिताभ बच्चन  फक्त ब्लँक ट्विट पोस्ट करत होते. यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. 

दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या 18 दिवसांनंतर अखेर 11 मे रोजी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली पोस्ट  लिहित मौन सोडलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कवितेच्या काही ओळीसुद्धा लिहिल्या आहेत. बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट -

‘छुट्टियाँ मानते हुए उस राक्षस ने निर्दोष पति पत्नी को बाहर खींच कर, पति को नग्न कर, उसके धर्म की पूर्ति करने के बाद, उसे जब गोली मारने लगा. तो पत्नी ने घुटने पे गिर कर, रो रो अनुरोध करने के बाद भी, की उसके पति को न मारो; उसके पति को उस बुज़दिल राक्षस ने, बेहद बेरहमी से, गोली मार कर, पत्नी को विधवा बना दिया! जब पत्नी ने कहा “मुझे भी मार दो”, तो राक्षस ने कहा “ नहीं! तू जाके ” …. ” को बता”. बेटी की मनःस्थिति पर पूज्य बाबूजी की एक कविता की पंक्ति याद आयी: मानो, वो बेटी ” …. “ के पास गई, और कहा: “है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया” (बाबूजी की पंक्ति) तो “ …. “ ने दे दिया सिंदूर! OPERATION SINDOOR! जय हिन्द जय हिन्द की सेना तू ना थमें गा कभी; तू न मुड़ेगा कभी; तू न झुकेगा कभी कर शपथ, कर शपथ, कर शपथ अग्नि पाथ! अग्नि पाथ ! अग्नि पाथ !’
 

अमिताभ बच्चन यांनी एकूण 19 ब्लँक पोस्ट केले. त्यानंतर आता विसाव्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी मोदींचा थेट उल्लेख केला नाही, परंतु ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी विशेषकरून पुरुषांना धर्मावरून लक्ष्य केलं होतं. इतकंच नव्हे तर “जाऊन मोदीला सांग, आम्ही काय केलं तं” अशी धमकी त्यांनी महिलांना दिली होती. मोदींनी त्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरद्वारे सडेतोड उत्तर दिल्याचं बिग बींनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group