दैनिक भ्रमर : अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शो च्या १७ व्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ११ ऑगस्ट रोजी हा शो सुरु झाला आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली. दरवर्षीप्रमाणे यावेळेही होस्टिंगची जबाबदारी अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे.
'कौन बनेगा करोडपती' या शोचा १५ ऑगस्टचा एपिसोड खूपच खास होता. कारण या इडिपेंडन्स स्पेशल एपिसोडमध्ये, ऑपरेशन सिंदूरच्या विरांगणा कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कमांडर प्रेरणा देवस्थळी केबीसी १७ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसल्या होत्या. या दरम्यान, तिघांनीही त्यांच्या शौर्याच्या कहाण्या सांगितल्या.
यासोबतच, त्यांनी बिग बींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय उत्तम पद्धतीने दिली आणि २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. तिघीही ५० लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या, पण तोपर्यंत हूटर वाजला आणि अमिताभ बच्चन यांना शो थांबवावा लागले. शोमध्ये जिंकलेले २५ लाख रुपये त्या त्यांच्या संस्थांच्या कल्याण निधीला दान करणार आहे.