"ती" वस्तू नाना पाटेकरांनी आजही ठेवलीय जपून ; काय दिले होते अमिताभ बच्चन यांनी?
img
Dipali Ghadwaje
अभिनेते नाना पाटेकर हे दिलखुलासपणे वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांची मतं मांडत असतात. नुकतंच बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या एका वस्तू बद्दल नाना पाटेकरांनी सांगितलं. 

काय म्हणाले नाना पाटेकर?

एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांना तसं सांगितलं तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं.

नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर त्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांबद्दल बोलताना दिसले. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरांचा उद्देश आहे. तसंच अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही नाना पाटेकर यांनी उजाळा दिला.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group