साधारण २०१८- १९ मध्ये हॉलिवूडमध्ये #MeToo ची चळवळ सुरु होती. अभिनय क्षेत्रात महिलांवर कसे अत्याचार होतात याबाबत महिलांनी उभी केलीली ही चळवळ होती. संपूर्ण जग या चळवळीची दखल घेत असताना भारतात देखील #MeToo चळवळीची सुरुवात झाली. सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर करून या चळवळीचे माध्यमातून तिच्यावर अत्याचाराबाबत भाष्य केले होते.
आता पुन्हा एकदा तनुश्री दत्ताने याबाबत भाष्य केले आहे. नुकताच इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. माध्यमांशी तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पाटेकर आणि गँग त्रास देत असल्याचा आरोप तनुश्रीनं केलाय. तसेच हे सर्व माझ्या जीवावर उठले आहेत असेही म्हणाली आहे.
नाना पाटेकर आणि बॉलिवूडची माफिया गँग मिळून मला त्रास देतेय, तसेच, नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत, मराठी माणूस म्हणून ते सहानुभूती घेतायत, असा आरोपही तनुश्री दत्तानं केलाय. होत असलेला हा त्रास आणि मानसिक छळ याला नाना पाटेकर जबाबदार असल्याचं तिने स्पष्टपणे म्हटलं आहे. ती म्हणाली “माझ्यासोबत या 4 ते 5 वर्षांपासून फार काही विचित्र घटना घडत आहेत. एकदा उज्जैनमध्ये माझ्या कारचा ब्रेक काढून टाकला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा पाठलाग केला गेला जात आहे .
मी जिथेही जायचे तिथे माझा पाठलाग करणारे लोक मला दिसायचे.माझा फोन देखील हॅक करण्यात आला होता. 2020 मध्ये मी खूप सारे प्रोजेक्ट साईन केले होते पण एक एक करून हे सगळे प्रोजेक्ट माझ्याकडून काढून घेण्यात आले. मला हा त्रास देण्यात नाना पाटेकरांचा हात आहे.” असं तिने गंभीर आरोप केला आहे.