बांगलादेशाचा पाकिस्तान विरोधात ऐतिहासिक विजय !
बांगलादेशाचा पाकिस्तान विरोधात ऐतिहासिक विजय !
img
दैनिक भ्रमर
बांगलादेशाने  पाकिस्तान विरोधात ऐतिहासिक विजय मिळविला आहे . विशेष म्हणजे हा त्यांचा पाकिस्तावरील पहिला विजय असून तो त्यांनी तब्बल १० विकेट्स राखून मिळवला आहे. पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना हा बांगलादेशबरोबर सुरु होता. या सामन्यात पाकिस्तानने आपला पहिला डाव घोषित केला आणि त्याचाच फटका त्यांना बसला. बांगलादेशला कमी लेखण्याची चूक यावेळी पाकिस्तानने केली आणि त्यामुळेच त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. कारण बांगलादेशने या सर्व गोष्टींचा चांगला फायदा उचलला आणि त्यांनी ऐतिहासिक विजय साकारला.

रावळपिंडीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेटने धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 30 रनच्या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशने एकही विकेट न गमावता 6.3 ओव्हरमध्ये यशस्वीरित्या पार केला. त्याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 13 टेस्ट मॅच खेळवल्या गेल्या होत्या, यातल्या 12 टेस्ट पाकिस्तानने जिंकल्या तर एक टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. बांगलादेशला 14व्या टेस्टमध्ये विजय मिळाला आहे.

बांगलादेशचा संघ २३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, पण आतापर्यंत बांगलादेशला पाकिस्तानवर कधीही कसोटी विजय मिळवता आला नव्हता. तब्बल २३ वर्षांनी त्यांना ही किमया साधता आली आहे. यावेळी बांगलादेशने फक्त विजय मिळवला नाही, तर आम्हाला कोणीही कमी लेखू नका असा इशआराही दिला आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी हा विजय खास आहे. कारण हा त्यांचा पाकिस्तावरील पहिला विजय असून तो त्यांनी तब्बल १० विकेट्स राखून मिळवला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group