मोठी बातमी  ! रोहित आणि  विराटनंतर आणखी एका खेळाडूची  क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती
मोठी बातमी ! रोहित आणि विराटनंतर आणखी एका खेळाडूची क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती
img
DB
 क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित आणि  विराटनंतर भारताच्या आणखी एका खेळाडूने क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.या खेळाडूने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. प्रियांक पांचाळ याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. प्रियांक पांचाळ याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिलं. तसेच टीमला जिंकवण्यात निर्णायक भूमिका बजावली.

प्रियांका पांचाळ याने एकाएकी निवृत्तीचा निर्णय घेत फर्स्ट क्लास क्रिकेटमधील प्रवासाला अर्जंट ब्रेक लावला आहे. प्रियांक पांचाळ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचं प्रतिनिधित्व करत होता. प्रियांक गुजरातच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. प्रियांकने अनेकदा अविस्मरणीय खेळी करत गुजरातचा एकहाती सामने जिंकून दिले होते. प्रियांकने त्याच्या कामगिरीची जोरावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ठसा उमटवला होता. तसेच त्याने छापही सोडली होती. त्यामुळए प्रियांकला टीम इंडियात संधी मिळाली होती. मात्र दुर्देवाने प्रियांकला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group