भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने शानदार पुनरागमन करत यजमान संघाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडने ३६८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय फलंदाजांनीही दमदार फलंदाजी करत सामन्यात रंगत आणली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी १३० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जैस्वालने ८५ धावांची आक्रमक खेळी केली, तर राहुलने नाबाद अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय सलामीवीरांनी ३२ वर्षांनंतर कसोटीमध्ये शतकी भागीदारी करण्याचा पराक्रम केला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. आता तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज न्यूझीलंडची आघाडी किती कमी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेलिंगटन कसोटीच्या पहिल्या डावातील न्यूझीलंडच्या 368 धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली आहे. आज पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपताना भारताच्या एक बाद 159 धावा झाल्या आहेत. टीम इंडिया न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून 209 धावा पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपताना केएल राहुल 52 धावांवर नाबाद आहे. देवदत्त पडिक्कल 16 धावा करुन क्रीजवर आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेट मिळणार नाही याची काळजी घेतली. दोघांनी ओपनिंग जोडीसाठी 130 धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालच्या रुपाने भारताने दुसऱ्यादिवशी एकमेव विकेट गमावला. त्याने वनडे स्टाइल बॅटिंग करताना 89 चेंडूत 85 धावा केल्या. यशस्वीने आकर्षक आणि वेगवान बॅटिंग केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी तरसवलं.
भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकवली. 10 वर्षात पहिल्यांदा न्यूझीलंडच्या भूमीवर परदेशी टीमच्या दोन्ही ओपनर्सनी टेस्ट मॅचच्या एकाच डावात 50 प्लस धावा केल्या आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये हॅमिल्टन टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानचे दोन्ही ओपनर समी असलम आणि अजहर अली यांनी 369 धावांचा पाठलाग करताना हा कारनामा केलेला.
सहाव्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी
न्यूझीलंडने पहिल्या दिवस अखेर 243 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचे पाच विकेट शिल्लक होते. आज 125 धावांची भर घातल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 368 धावांवर आटोपला. ग्लेन फिलिप्सचा मुख्य अडथळा आकाश दीपने दूर केला. न्यूझीलंडकडून हेनरी निकोल्स 335 चेंडूत (175) धावा आणि ग्लेन फिलिप्सने 216 चेंडूत (118) धावा केल्या. या दोघांच्या बळावर न्यूझीलंडने 368 धावांचा टप्पा गाठला.
भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला
दोघांनी सहाव्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी केली. निकोल्स आणि फिलिप्सला बाद करताना भारताच्या चांगल्याच नाकीनऊ आल्या. दोघांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. कालच्या पहिल्या दिवसाच्या खेळात सुरुवातीच्या सत्रावर भारताने वर्चस्व गाजवलं होतं. 5 बाद 70 अशी न्यूझीलंडची अवस्था होती.