बीसीसीआयचा मोठा निर्णय ! ट्राय सीरिजसाठी इंडिया ए टीममध्ये ''या'' खेळाडूला  संधी
बीसीसीआयचा मोठा निर्णय ! ट्राय सीरिजसाठी इंडिया ए टीममध्ये ''या'' खेळाडूला संधी
img
Nandini khandare More
भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी इंडिया ए संघात अखेरच्या क्षणी बदल करण्यात आला आहे. श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी इंडिया ए संघात अखेरच्या क्षणी बदल करण्यात आला आहे. इंडिया ए टीम या ट्राय सीरिजसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. इंडिया ए व्यतिरिक्त श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए या संघात त्रिकोणी मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 21 जून रोजी ट्राय सीरिजची सांगता होणार आहे.



यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या इंडिया ए संघात विदर्भाचा युवा खेळाडू  हर्ष दुबे याची निवड झाली होती. मात्र आता त्याच्या जागी अनुकूल रॉय याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरून या बदलाची अधिकृत माहिती दिली.

हर्ष दुबे याला वगळण्यामागचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. आयपीएल 2026 नंतर अफगाणिस्तानचा भारत दौरा होणार असून त्या मालिकेसाठी हर्ष दुबे याची निवड करण्यात आली आहे. तो टीम इंडियासाठी कसोटी आणि वनडे मालिकेत सहभागी होणार असल्याने त्याला इंडिया ए दौऱ्यातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या जागी अनुकूल रॉयची निवड करण्यात आली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group