IND vs NZ ODI : भारताचा पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर ५ विकेट्सनी दणदणीत विजय
IND vs NZ ODI : भारताचा पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर ५ विकेट्सनी दणदणीत विजय
img
Nandini khandare More
ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५ गडी राखून धुव्वा उडवला. पावसाच्या व्यत्ययामुळे वारंवार थांबलेल्या या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार मिळालेले १४३ धावांचे सुधारित लक्ष्य २२.४ षटकांत पार केले. या शानदार विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीच्या 74 धावांच्या खेळीने भारताचा विजय सोपा केला, तर अर्शदीप सिंगने 4 विकेट घेत गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलने गोलंदाजांसह संपूर्ण संघाचं कौतुक केलं. रोहित शर्माच्या एका रनआउटमुळे सामन्याची दिशा बदलल्याचंही त्याने सांगितलं. किवी संघाने त्यांच्या पहिल्या डावामध्ये केवळ 184 धावांचं आव्हान टीम इंडियाला दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा खाते न उघडता पहिल्याच आऊट झाल्याने न्यूझीलंड सामन्यावर पकड मिळवणार की काय असं वाटत होतं पण विराट आला आणि त्याने ताबडतोड खेळ दाखवला. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने हा विजय सहज मिळवला.

टीम इंडियाची एकदिवसीय मालिकेमध्ये विजयी आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेनंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. या मालिकेमध्येही 5 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी पहिला सामना हा 5 विकेटने भारताने जिंकून मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. हा सामना ऑकलंडमध्ये खेळवला गेला. या सामन्यात किंग कोहलीचा जलवा पाहायला मिळाला. त्याने जोरदार फटकेबाजी करत 74 धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून अर्शदीपने सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. भारताने या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर बॉलिंगचा निर्णय घेतला होता. यासामन्यामध्ये टीम इंडियाने 4 वेगवागन गोलंदाजांना खेळवलं.

कर्णधार गिल सामन्यानंतर म्हणाला….
दरम्यान, या सामन्यानंतर बोलताना कॅप्टन शुभमन गिलने गोलंदाजांचं कौतुक करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “नक्कीच, आम्ही गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि क्षेत्ररक्षणही उत्कृष्ट होते. रोहित भाईने केलेल्या ‘रन-आउट’मुळे सामन्याची दिशाच बदलली. एकूणच, हा एक उत्तम सांघिक प्रयत्न होता. अंशुल अशा प्रकारचा गोलंदाज आहे जो या परिस्थितीसाठी अगदी योग्य आहे, तर गुरनूर जुन्या चेंडूने अतिरिक्त उसळी (बाऊन्स) मिळवून देऊ शकतो. ज्या पद्धतीने या दोघांनी गोलंदाजी केली… ती खरोखरच शानदार होती. पावसानंतर चेंडू अधिक वेगवान आणि धारदार झाला होता. विराट भाईने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे आमच्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या. आमच्यासाठी सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.”


त्यामुळे आता 1-0 अशी आघाडी घेतलेली टीम इंडिया आता या एकदिवसीय सामन्यामध्ये पुढे कशी कामगिरी करणार याकडेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.
criket |
इतर बातम्या
Join Whatsapp Group