भारताला धक्का ! बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी भारताविरोधात घेतला मोठा निर्णय
भारताला धक्का ! बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी भारताविरोधात घेतला मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
बांगलादेशात सत्तापरिवर्तन झाले असून तारिक रहमान यांच्या हातात बांगलादेशची सत्ता आहे. तारिक रहामान यांच्या हातात बांगलादेशची सत्ता गेल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील संबंध सुधारतील, असा अंदाज होता. मात्र, तारिक रहमान यांच्याकडून भारताला अत्यंत मोठा धक्का देण्यात आला.

भारतीय बजेट एअरलाइन स्पाइसजेटला थेट त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाने भारतात खळबळ उडाली. यामुळे आता कोलकाता ते गुवाहाटीला जाणाऱ्या काही विमानांचा मार्ग अधिक लांब होईल. मागील काही वर्षांपासून भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले राहिले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून संबंध तणावात दिसत आहेत. 

बांगलादेश सरकारने ही कारवाई फक्त स्पाइसजेटवर केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, थकबाकी न भरल्यामुळे हे पाऊस उचलण्यात आले. थकबाकीचे स्वरूप आणि रक्कम अजून स्पष्ट झाली नाहीये. स्पाइसजेटने सांगितले की, एअरलाइन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. लवकर तोडगा काढण्यावर आमचा भर आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group