इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता इतर देशांवर होताना दिसत आहे. इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्धामुळे रुपयाची किंमत घसरली असून शेअर मार्केटही कोसळले आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किंमती देखील वाढल्या आहेत. यामुळे इराण-इस्त्रायल युद्धाचा गंभीर परिणाम भारतावर होत असल्याचे दिसत आहे. या युद्धाचा भारताला देखील फटका बसत आहे. व्यापारासाठी सुरु असलेली काही सागरी वाहतूक सध्या बंद आहे. ज्यामुळे आयात निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.
युद्धाचा परिणाम थेट रुपयावर झाला आहे. दिवसेंदिवस रुपयाची किंमत घसरत आहे आणि डॉलरची किंमत वाढत आहे. रुपयाची किंमत ९२.२० डॉलर प्रति डॉलरवर आली आहे. रुपयाची किंमत घसरल्याने भारताला फटका बसला आहे. जेव्हापासून युद्ध सुरु आहे तेव्हापासून शेअर मार्केट कोसळताना दिसत आहे. आज सकाळी शेअर मार्केटची सुरुवात लाल रंगासह झाली. बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स २४०० पेक्षा जास्त अंकानी घसरला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजची निफ्टी ७०० अंकांनी घसरली आहे.
सेन्सेक्स सकाळी ७६,४२४ रुपयांवर व्यव्हार करत होते. तर निफ्टी २३,८६८ वर ओपन झाला होता. यामुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले आहे. गुंतवणूकदारांचे अवघ्या काही मिनिटात जवळपास १२ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
इराण-युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. आज कच्च्या तेलाचे दर ११७ डॉलर प्रति बॅरलवर आहेत. आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भविष्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलवर होतो.