खळबळजनक ! आता इराणला सोडून इस्त्रायलने केला 'या' देशावर बॉम्ब हल्ला
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका या तीन देशांतील युद्धाने आधीच जगात खळबळ उडाली आहे. युद्धामुळे इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचलेय. या युद्धाचा भडका वाढलेला असताना इस्त्रायलकडून थेट दक्षिण सीरियावर हल्ला करण्यात आला.
नुकताच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. हैराण करणारी बाब म्हणजे इस्त्रायलच्या निशाण्यावर यावेळी इराण नव्हते तर इस्त्रायलकडून थेट दक्षिण सीरियावर हल्ला करण्यात आला. दक्षिण सीरियातील सीरियन राजवटीच्या लष्करी पायाभूत सुविधांवर थेट मोठा हल्ला इस्त्रायलकडून करण्यात आला. इस्रायली संरक्षण दलाने रात्रीच्या वेळी दक्षिण सीरियातील सीरियन लष्करी तळांवरील एक कमांड सेंटरवर आणि लढाऊ उपकरणांना टार्गेट करून हल्ला केला.
इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली. अस-सुवैदा परिसरात द्रुझ नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणवर हल्ला करता करता थेट इराकला इस्त्रायलने टार्गेटवर घेतले. सध्याची परिस्थिती बघता हे युद्ध अधिक भडकण्याचे मोठे संकेत आहेत.