युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी : अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, “चर्चेसाठी फक्त विनवण्या, चर्चा झालीच नाही”, इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला
युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी : अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, “चर्चेसाठी फक्त विनवण्या, चर्चा झालीच नाही”, इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेने इराणविरोधातील कारवाया वाढवल्या असून इराणला नेस्तनाबूत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, इराणमधील इस्फाहान शहरातील एका मोठ्या दारूगोळा कोठारावरा २००० पाऊंडच्या पेनिट्रेटर (बंकर-बस्टर) बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने मंगळवारी पहाटे या हल्ल्याचे वृत्त दिले. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एकामागून एक अनेक स्फोट आणि आगीच्या ज्वाळा निर्माण झालेले दिसत आहे. 



दरम्यान, इराणने २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेसोबत कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चा केल्याचा दावा ठामपणे फेटाळून लावला आहे. याउलट, वॉशिंग्टनकडून वारंवार असे विधान केले जात होते की ही चर्चा “अतिशय उत्तम” रितीने पुढे सरकत आहे.

मंगळवारी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या ३१ दिवसांत आमची अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्यक्षात फक्त चर्चेची एक विनंती आणि अमेरिकेचे काही प्रस्ताव पाकिस्तानसह ठराविक मध्यस्थांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचले आहेत,” असं इस्माइल बाकई यांनी ‘X’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, लष्करी कारवाया सुरू असताना इराण पूर्णपणे स्वतःच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करून आहे. जुन्या राजनैतिक ‘विश्वासघातांच्या’ आठवणींमुळे इराणने सावध पवित्रा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. अमेरिकेचे लष्करी आक्रमण आणि घुसखोरी पूर्ण तीव्रतेने सुरू असताना, आमचे सर्व प्रयत्न आणि क्षमता इराणच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी समर्पित आहेत. “आम्ही जुने अनुभव आमच्या मांस, त्वचा आणि हाडांनी अनुभवले आहेत आणि एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मुत्सद्देगिरीचा (diplomacy) दोनदा जो विश्वासघात झाला, तो आम्ही विसरलेलो नाही,” असे ते म्हणाले.

america | iran | war |
इतर बातम्या
Join Whatsapp Group