अमेरिका-इराण युद्धाचे जागतिक स्तरावर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या युद्धामुळे भारतात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवड्यामुळे घरगुती सिलिंडर वितरणाला सरकारकडून प्राधान्य दिलं जात असलं तरी अनेकांना सिलिंडरसाठी बुकिंगनंतरही बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. सिलिंडरचा काळाबाजारही उघड होत आहे. अशातच आता सोशल मीडियावर देखील हा विषय चांगलाच गाजतोय. नेटकरी अनेक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहे.
अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अनेक स्टारकिड्सचा जिवलग मित्र ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरी याने एक व्हिडीओ शेअर केला आहे जो आता तुफान व्हायरल होत आहे. जान्हवी कपूर, खुशी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, निसा देवगण यांसारख्या स्टारकिड्सचा खास मित्र असलेला ऑरी हा सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ पोस्ट करत असतो. त्याच्या रील्सला लाखो व्ह्यूज मिळतात. नुकतीच त्याने एलपीजी सिलिंडरबाबत एक मजेशीर रील पोस्ट केली आहे.
जान्हवी आणि खुशी कपूरचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये बोनी कपूर हे मुलीचे वडील असून ऑरी त्यांच्या मुलीसाठी मागणी घालतो. “मी तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो”, असं ऑरी म्हणताच बोनू कपूर त्याला विचारतात, “पण तुझ्याकडे तिला देण्यासाठी काय आहे?” या प्रश्नाचं उत्तर देताना ऑरी थेट एलपीजी सिलिंडरचा ट्रकच दाखवतो. कधी सिलिंडर उचलताना तर सिलिंडरची गाडी चालवताना तो पुढे दिसतो.
ऑरीच्या या विनोदबुद्धीवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओवर खुशी कपूरनेही कमेंट केलं आहे. ‘कोणत्या मुलीसाठी विचारतोय’, असा सवात तिने केला आहे. त्यावर ऑरीने खुशी आणि अंशुला या दोघींची नावं लिहिली आहेत. ऑरीच्या या रीलला तब्बल 4.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर 282 हजार लाइक्स मिळाले आहेत.