इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले 'हे' मिसाईल पहिल्यांदाच बाहेर काढले, ५०० सेकंदात थेट...
इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले 'हे' मिसाईल पहिल्यांदाच बाहेर काढले, ५०० सेकंदात थेट...
img
वैष्णवी सांगळे
मध्य पूर्वेत इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने आक्रमण केल्यानंतर आता युद्धाचा १७ वा दिवस सुरु आहे. या युद्धात आता इराण पहिल्यांदाच त्यांच्याकडील उन्नत सेज्जिल मिसाईलचा वापर करुन आयर्न डोम एअर डिफेन्सला चकमा दिला आहे. इराणने रविवारी इस्राईल आणि अमेरिकेशी संबंधीत ठिकाणांवर ज्या मिसाईल डागल्या त्यात सेज्जिल देखील होती. या मिसाईलच्या खास क्षमतेमुळे तिला डान्सिंग मिसाईल म्हटले जाते.

इराणच्या सरकारी मीडियानुसार २८ फेब्रुवारीला सुरु झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदाच सेज्जिल मिसाईलचा वापर केला गेला आहे. ही मिसाईल संपूर्णपणे इराणमध्ये डिझाईन आणि विकसित केलेली आहे. या सज्जिल आणि आशुरा किंवा अशुरा मिसाईल नावाने देखील ओळखले जाते.

हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा १२ ते १४ पटीने जास्त वेगाने प्रवास करू शकते. इराणपासून इस्रायलचे अंतर पार करण्यासाठी या क्षेपणास्त्राला केवळ ७ ते ८ मिनिटे (सुमारे ५०० सेकंद) लागतात. याची मारक क्षमता २००० ते २५०० किलोमीटरपर्यंत आहे, ज्यामुळे संपूर्ण इस्रायल आणि युरोपचा काही भाग याच्या टप्प्यात येतो. हे दोन टप्प्यातील 'सॉलिड फ्युएल' वर चालणारे क्षेपणास्त्र आहे. घन इंधनामुळे हे क्षेपणास्त्र अतिशय कमी वेळात प्रक्षेपित करता येते, ज्यामुळे शत्रूच्या रडारला सावध होण्याची संधी मिळत नाही.

इराणचा दावा आहे की, 'सेजिल'चा वेग आणि त्याची दिशा बदलण्याची क्षमता यामुळे इस्रायलची 'आयर्न डोम' किंवा 'अॅरो' ही संरक्षण यंत्रणा भेदणे सोपे आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये हाय-अलर्ट घोषित करण्यात आला असून नागरिकांना बंकरमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.२००८ मध्ये पहिल्यांदा या मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने किंवा इस्रायलने त्यांचे हल्ले थांबवले नाहीत, तर यापेक्षाही घातक क्षेपणास्त्रांचा वापर केला जाईल. या नव्या शस्त्राच्या वापरामुळे आता जागतिक महासत्तांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group