अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता विकोपाला गेले आहे. इराणमधील प्रमुख शहरांवर मोठ्या प्रमाणात मिसाईल डागली जात आहे. या हल्ल्यांत इराणमधील अनेक प्रमुख नेत्यांचा मृत्यू झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांची निवड करण्यात आली.
आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा जीव गेला. इराणमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, सरकारी इमारती पाडण्यात आल्या. त्यामध्येच अमेरिकेने अत्यंत मोठा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. हा दावा इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबद्दल आहे, या दाव्याने खळबळ उडाली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही हल्ल्यात ठार करण्यात आल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेने केला आहे. खरोखरच नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार केले का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकेच्या या दाव्यावर इराणकडून अजून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट आपली लष्करी ताकद दाखवणारा व्हिडीओ त्यांनी शेअर केला.
इराणी लोक सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याच बघायला मिळाले. त्यामध्येच अमेरिकेच्या दाव्याने जगात खळबळ उडाली. अली रजा अराफी मारले गेल्याचा दावा NSA ने केला. इस्त्रायलच्या न्यूक्लिअर प्लॅंटवर इराणकडून मोठा धमाका करण्यात आला. या युद्धाच्या झळा अनेक खाडी देशांना बसताना दिसत आहेत. फ्रेंचची युद्ध नाैका इराणच्या दिशेने निघाली आहे.