आबुधाबी (भ्रमर वृत्तसेवा) :- आबुधाबी व दुबईला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी आबुधाबी संस्कृती आणि पर्यटन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युद्धामुळे हवाई सेवा बंद असल्याने अनेक पर्यटक दुबई व आबुधाबी येथे अडकले आहेत.
ज्या पर्यटकांची हॉटेलमधील चेकआऊट डेट संपली असेल किंवा चेकआऊट डेट जवळ आली असेल आणि ते आपल्या घरापर्यंत प्रवास करू शकणार नसतील, अशा पर्यटकांना तेथे राहण्याची मुदत वाढवून देण्याबाबत पर्यटन विभागाने सांगितले आहे. ते मायदेशी जायीपर्यंत तेथेच राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आबुधाबी संस्कृती व पर्यटन विभागाने सर्व हॉटेलचालकांना दिल्या आहेत.
हा सर्व खर्च आबुधाबी संस्कृती आणि पर्यटन विभाग उचलणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.