घडामोडींना वेग,  इराणचा भारताला फोन, सध्याच्या परिस्थितीवर...
घडामोडींना वेग, इराणचा भारताला फोन, सध्याच्या परिस्थितीवर...
img
वैष्णवी सांगळे
इराण आणि अमेरिका युद्ध आता जगासाठी डोकेदुखी ठरली आहे. निष्पाप बळी, मानसिक आणि आर्थिक नुकसान यांचा सामना हे देश करताना इंधन तुटवड्यामुळे जगात वेगळेच संकट निर्माण होत आहे. दरम्यानच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थाली यांच्यासोबत नुकताच मध्य पूर्वेतील संघर्षावर चर्चा केली. मात्र, यादरम्यान नक्की काय चर्चा झाली, याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.

ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्याकरिता ४८ तासाचा वेळ दिला. त्यानंतरच हा फोन इराणमधून आल्याची माहिती आहे. जयशंकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांचा फोन आला होता. कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री अल नाहयान यांच्यासोबतही चर्चा झाली. सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली.

नवी दिल्लीच्या इराणी दूतावासाने म्हटले की, दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. ही चर्चा अशावेळी झाली, ज्यावेळी मध्य पूर्वेत तणाव आहे. यासोबतच इराणला मोठी धमकी देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, आता जर होर्मुज खाडी खुली केली नाही तर सर्वकाही नष्ट करू. होर्मुज खाडीत भारताचेही अनेक जहाज अडकले आहेत.

होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत. शिवाय अनेक देशात गॅस आणि तेलाची मोठी समस्या आहे. इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर स्थितीत आहे. अशावेळी आखाती देश भारतासोबत चर्चा करत आहेत. शिवाय इराणकडूनही भारताला थेट फोन आला. 48 तास पुन्हा एकदा वेळ इराणला अमेरिकेने दिला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group