अमेरिका-इराण तणावाने संपूर्ण जगाला वेठीस धरले असून त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत. वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तुंना तुटवडा आता जाणवू लागला आहे. दम्यान आता या तणावाचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार , सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकामध्ये 0.5% हून अधिक घसरण दिसली. संस्थागत परदेशी गुंतवणूकदारांनी FII विक्री सत्र आरंभले. त्याचा थेट परिणाम दिसला. सकाळी 9.16 वाजेपर्यंत सेन्सेक्स 452 अंकांहून अधिकने घसरून 73,815.12 वर आला. तर निफ्टी 50, 153 अंक घसरून 23,229 अंकावर पोहचला. इंडेक्समध्ये बजाज फायनान्साचा शेअर घसरला. या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांची घसरण आली. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), बजाज फिनसर्व, ट्रेंट, NTPC, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि L&T या शेअरने निराश केले. हे शेअर 1-2 टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक आणि इतर आयटी शेअरमध्ये 1-3 टक्क्यांची वाढ दिसली. बाजार अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी बजावत असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स दोन्हीमध्ये जवळपास 1% टक्क्यांची घसरण झाली आहे. क्षेत्रानुसार विचार करता, निफ्टी ऑटो, निफ्टी रियाल्टी, निफ्टी कंझ्युमर ड्यूरेबल्स आणि इतर निर्देशांकात 1% पेक्षा अधिकने घसरले आहेत. तर निफ्टी IT मध्ये जवळपास 2 टक्क्यांची वाढ दिसली. NSE वर जवळपास 887 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर 1,650 शेअरमध्ये घसरण झाली आहे. 97 शेअर जैसे थे आहेत.