क्रिकेट विश्वात खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, नेमकं प्रकरण काय?
क्रिकेट विश्वात खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, नेमकं प्रकरण काय?
img
Dipali Ghadwaje
1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. मात्र, याआधीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. 

टी-20 वर्ल्ड कपवर दहशतवादी हल्ल्याचे संकट निर्माण झाले आहे. ही धमकी पाकिस्तानकडून आली आहे. मात्र, यादरम्यान क्रिकेट वेस्ट इंडिजने पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. 

1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होणार असून अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 55 सामने होणार असून त्यात 40 गट सामने होतील आणि त्यानंतर सुपर 8 सामने आयोजित केले जातील. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या आयएस-खोरासानकडून वर्ल्ड कपदरम्यान कॅरेबियन देशांना लक्ष्य करण्याचा धोका आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने टी-20 वर्ल्ड कपसह जगभरातील मोठ्या स्पर्धांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group