गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिडा श्रेत्रात घटस्फोटाची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पती पारूपल्ली कश्यपला घटस्फोट दिला. सायना रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर घटस्फोटाच्या निर्णयाची माहिती दिली. अशातच आता सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यपनंतर आणखी एका खेळाडूने घटस्फोट घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय पैलवान दिव्या काकरानने पती सचिन प्रताप सिंहशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त करत घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.
अर्जुन पुरस्कार विजेता दिव्या काकरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, घटस्फोट हा आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग आहे. यात भरपूर दु:ख,चिंता आणि त्याग करावा लागतो. ही गोष्ट सहज शेअर करण्यासारखी नाही. मात्र, तुमच्या पांठिब्यामुळे शेअर करणे आवश्यक वाटली'.
दिव्याने पुढे म्हटलं की, 'आता हळू हळू सर्व ठीक होत आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकतं. कारण तुमच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडतात. आता मी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, असं आयुष्यात घटना घडत असतात'.
घटस्फोटाच्या निर्णयाला आई-वडिलांनी पाठिंबा दिल्याचे दिव्याने सांगितलं. दिव्या काकरान प्रसिद्ध पैलवान आहे.
दिव्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. दिव्याने घेतलेल्या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दिव्या काकरान सध्या नोएडामध्ये तहसीलदार पदावर काम करत आहे.
दिव्या काकरानचं २१ फेब्रुवारी २०२३ रोजी मेरठमध्ये जिम ट्रेनर सचिन प्रताप सिंहसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या एका वर्षाआधी दिव्या सचिनसोबत रिलेशनमध्ये होती.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर राज्य सरकारने दिव्याला तहसीलदर पद दिलं होतं.