भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये राजकोटच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
दरम्यान राजकोटची खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार की फलंदाजांची चांदी होणार? असे अनेक प्रश्व उपस्थित होत आहेत. दरम्यान राजकोटच्या खेळपट्टीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राजकोटच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारतीय टीम मॅनेजमेंट स्लो टर्न होणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्यास अधिक भर देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.’
या सामन्याला १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. तर या सामन्यापूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी राजकोटच्या मैदानावर एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात, भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजाराचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या स्टेडियमचं नाव बदलून निरंजन शाह ठेवण्यात येणार आहे.
भारत- इंग्लंड उर्वरीत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.