रणजी ट्रॉफी राहणार महाराष्ट्रातच! मध्य प्रदेशला नमवत विदर्भ अंतिम फेरीत, मुंबईला भिडणार
रणजी ट्रॉफी राहणार महाराष्ट्रातच! मध्य प्रदेशला नमवत विदर्भ अंतिम फेरीत, मुंबईला भिडणार
img
Dipali Ghadwaje
अतिशय चुरशीच्या अशा सेमी फायनल लढतीत तुल्यबळ मध्य प्रदेश संघाला ६२ धावांनी नमवत विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स मैदानावर झालेल्या या मुकाबल्यात विदर्भला पाचव्या आणि अंतिम दिवशी पाच विकेट्सची तर मध्य प्रदेशला ९३ धावांची आवश्यकता होती. पण विदर्भच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत अवघ्या तासाभरात मध्य प्रदेशचा डाव गुंडाळला आणि दिमाखदार विजय साकारला.

मुंबईने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा 2 मध्ये पराभव केला. अंतिम सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ संघ 41 वेळा चॅम्पियन मुंबईशी भिडणार आहे. म्हणजे यावेळी रणजी ट्रॉफी ही महाराष्ट्रातच राहणार असल्याची माहिती समोर येतेय. 

विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला आहे. विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विदर्भाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 170 धावांवर आटोपला. यानंतर मध्य प्रदेशने पहिल्या डावात 252 धावा करत आघाडी घेतली.

पण विदर्भाने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत सामन्यात पुनरागमन केले. यश राठोडच्या 141 धावांच्या खेळीच्या जोरावर विदर्भाने दुसऱ्या डावात 402 धावा केल्या. अशाप्रकारे मध्य प्रदेशला 321 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. 

१० तारखेपासून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होणार असलेल्या अंतिम लढतीत विदर्भसमोर बलाढ्य मुंबईचं आव्हान असणार आहे. मुंबईने सेमी फायनलच्या लढतीत तामिळनाडूवर डावाच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. यानिमित्ताने रणजी करंडक महाराष्ट्रातच राहण्याचा योग जुळून आला आहे. मुंबईच्या नावावर तब्बल ४१ तर विदर्भच्या नावावर २ जेतेपदं आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group