नरेंद्र मोदी स्टेडिअमची सुरक्षा वाढवली;
नरेंद्र मोदी स्टेडिअमची सुरक्षा वाढवली; "हे: आहे कारण
img
दैनिक भ्रमर

14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

या सामन्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देणारा मेल काल एका अज्ञात व्यक्तीने पाठवला होता. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी स्टेडिअमची सुरक्षा वाढवली आहे. भारत पाकिस्तान सामन्याआधी स्टेडिअम उडवून देऊ अशी धमकी देणारा मेल आला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. धमकीला घाबरण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

दरम्यान, मुंबई पोलिसांना धमकीचा ईमेल आला होता. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधानांना मा ण्याची आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी दिली होती. पाठवणाऱ्याने 500 कोटी रुपये आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची तुरुंगातून सुटका करण्याची मागणीही त्या मेलद्वारे केली होती.

अतिरिक्त पोलीस आयुक्त चिराग कोराडिया यांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. ते म्हणाले की, भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीला घाबरण्याची गरज नाही. इतर सामन्याच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहने, हॉटेल, ढाबा यासह गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने प्रेक्षकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group