देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना !  खाकीची एक साक्ष आणि तब्बल ९ पोलिसांना फाशीची शिक्षा
देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना ! खाकीची एक साक्ष आणि तब्बल ९ पोलिसांना फाशीची शिक्षा
img
वैष्णवी सांगळे
तामिळनाडूतील बहुचर्चित साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात 6 वर्षांनंतर नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एका वडील आणि मुलाचा पोलीस छळात झालेल्या मृत्यूच्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, या प्रकरणाला अंतापर्यंत नेण्यात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाम उभे राहण्यात एका कनिष्ठ महिला पोलीस कर्मचाऱ्याची, हेड कॉन्स्टेबल रेवती यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

कॉन्स्टेबल रेवती यांना धमकावण्याचे , दाबण्याचे अनेक प्रयत्न झालेत परंतु त्यांनी दाखवलेल्या धाडसाने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आणि ९ पोलिसांना फाशीची शिक्षा मिळली.  रेवती न्यायदंडाधिकाऱ्यांना सांगितले की की संपूर्ण सत्य सांगण्यास तयार आहे, पण मुलांच्या सुरक्षेची आणि नोकरीची हमी हवी आहे. रेवती यांचे शौर्य आणि सत्याप्रती असलेली तिची निष्ठा या प्रकरणाला अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण ठरली. 

देशाला हादरवणारी घटना 
जून 2020 मध्ये संपूर्ण जग कोविड निर्बंधांशी झुंज देत होते. कोविड निर्बंधांचे उल्लंघन करून मोबाईलचे दुकान उशिरापर्यंत उघडे ठेवल्याच्या आरोपावरून पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कॉन्स्टेबल रेवती यांनी न्यायालयाला सांगितले, "मी रात्री 8:50 च्या सुमारास पोलिस स्टेशनला पोहोचले. त्याच क्षणी, मला आतून किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू आले, कोणीतरी ओरडत होते, 'आई, दुखतंय! मला सोडा! कृपया मला सोडा! मी काही चुकीचं केलेलं नाही"

ज्या रात्री ही घटना घडली, त्या रात्री रेवती साथानकुलम पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. आपल्याच सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला अमानवीय छळ त्यांनी जवळून पाहिला होता. जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट एम.एस. भारतीदासन हे पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा रेवती यांनी अत्यंत धाडसाने समोर येत सत्य सांगण्याचा निर्णय घेतला.

दोषी ठरलेले कर्मचारी (मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले)
न्यायालयाने या नऊ अधिकाऱ्यांना हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले

एस. श्रीधर (तत्कालीन निरीक्षक/एसएचओ)
पी. रघु गणेश (उपनिरीक्षक)
के. बालकृष्णन (उपनिरीक्षक)
एस. मुरुगन (हेड कॉन्स्टेबल)
ए. सामीदुराई (हेड कॉन्स्टेबल)
एम. मुथुराज (कॉन्स्टेबल)
एस. चेल्लादुराई (कॉन्स्टेबल)
एक्स. थॉमस फ्रान्सिस (कॉन्स्टेबल)
एस. वेलुमुथु (कॉन्स्टेबल)
दहावा आरोपी, विशेष उपनिरीक्षक पॉलदुराईचा 2020 मध्ये खटला सुरू असतानाच कोविड-19 मुळे मृत्यू झाला.
रक्तस्राव होईपर्यंत मारहाण, गुप्तांगांवर बुटांनी फटके

रेवती यांनी सांगितले की, कधीकधी सब-इन्स्पेक्टर बालकृष्णन यांचा आवाज ऐकू येत होता, ते म्हणत होते, "स्टेशनमध्ये गोंधळ घालण्याची तुमची हिम्मत कशी झाली? तुम्ही काही मोठे मर्द आहात का?" पोलिसांनी जयराज आणि बेनिक्स यांना रक्त येईपर्यंत मारहाण केली. त्यांनी बाप-लेकाच्या गुप्तांगांवर बुटांनी फटके मारले. या दरम्यान, पोलीस दारू पिण्यासाठी थांबायचे आणि नंतर पुन्हा मारहाण सुरू करायचे. जेव्हा दोघेही अर्धमेले झाले होते, तेव्हा रेवती यांनी सहानुभूतीपोटी जयराज (वडील) यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला, पण इतर पोलिसांनी ती हिसकावून घेतली आणि फेकून दिली.

रेवती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे कपडे काढण्यात आले आणि त्यांचे हात बांधण्यात आले. अशी क्रूरता सहन न झाल्याने रेवती निघून गेल्या. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांनी मुलगा बेनिक्स मरण पावला आणि दुसऱ्या दिवशी वडील जयराज मरण पावले. देशभरात संतापाची लाट उसळली, पण पोलीस खात्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. नऊ पोलिसांवर आरोप ठेवण्यात आले. 

जेव्हा न्यायदंडाधिकारी एम. एस. भारथिदासन चौकशीसाठी आले, तेव्हा रेवती त्यांना म्हणाली, "साहेब, मी तुम्हाला सर्व काही सांगेन, प्रत्येक लहान-मोठा तपशील, जे सत्य लपवले जात आहे ते. मी दोन मुलींची आई आहे." तुम्ही माझ्या मुलांच्या सुरक्षेची आणि माझ्या नोकरीची हमी देऊ शकता का?

सहकारी अधिकाऱ्यांनी इशारा देऊनही, रेवती यांनी बोलण्याचा निर्णय घेतला. ज्या पोलिस दलात एखाद्या सदस्याने आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध साक्ष देणे दुर्मिळ असते, त्यांचा निर्णय अभूतपूर्व होता.  भीतीच्या छायेत आपल्या सहकारी अधिकाऱ्यांविरुद्ध साक्ष दिली. जबाब नोंदवताना, बाहेर जमलेले पोलीस अधिकारी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना धमक्या देत होते आणि रेवती यांचा अपमान करत होते. तणाव इतका तीव्र होता की दंडाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षक तैनात करावे लागले. सुरक्षेचे आश्वासन मिळाल्यानंतरच रेवती यांनी सही करण्यास संमती दिली. सीसीटीव्ही फुटेजमधील प्रत्येक आरोपीला ओळखले. तिच्या क्षणोक्षणीच्या साक्षीने हे सिद्ध झाले की त्या रात्री पोलीस ठाण्यात कोण उपस्थित होते आणि त्या दोघांच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार होते. रेवती यांचे धैर्य न्यायाचा पाया बनले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group