भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; तामिळनाडूतील घटना
भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; तामिळनाडूतील घटना
img
वैष्णवी सांगळे
विमान अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहे. दरम्यान आज तामिळनाडूच्या तंबरममध्ये दुपारी २ वाजेच्या सुमारास भारतीय वायुसेनेचं प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणादरम्यान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात पायलट सुरक्षित आहे. या अपघातानंतर वायुसेनेने चौकशीचे आदेश दिले आहेत.



भारतीय हवाई दलाचे विमान प्रशिक्षणार्थी विमान हे उपल्लम येथील जमिनीवर कोसळलं. अपघातादरम्यान पायलटने स्वत: उडी मारली. हे सिंगल ट्रेनर एअरक्राफ्ट होतं. पायलटने उडी मारत स्वत: चा जीव वाचवला. दुर्घटनेनंतर ३० मिनिटानंतर आयएएफचं हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर पायलटला घेऊन गेले.

भारतीय वायूसेनेकडून अपघातानंतर अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रशिक्षाणार्थी विमान हे पीसी-७, पिलेटस रुटीन ट्रेनिंग मिशन होते. या ट्रेनिंगदरम्यान चेन्नईच्या तंबारामजवळ विमान कोसळलं.या घटनेनंतर भारतीय वायूसेनेने कोर्ट ऑफ इंक्वॉयरीचे आदेश दिले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group