तामिळनाडूतील एका मोठ्या पक्षात पडली उभी फूट ! नक्की काय घडतंय ?
तामिळनाडूतील एका मोठ्या पक्षात पडली उभी फूट ! नक्की काय घडतंय ?
img
दैनिक भ्रमर



 तामिळनाडू राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याची  महिती समोर येत आहे. थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून आता राजकरणात घडामोडींना वेग आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच TVK पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.118 हा बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. आता विजय यांना तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्याआधी त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. तामिळनाडूच एका मोठ्या पक्षात फूट पडली आहे. त्याचा थेट फायदा विजय यांना होणार असून त्यांचं सरकार अधित सुरक्षित होणार आहे.

बहुमतासाठी आवश्यक असलेल्या सदस्यांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. बहुमत चाचणीच्या बरोबर एकदिवस आधी AIADMK आणि AMMK च्या आमदाराने विजय यांना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे. AIADMK चे वरिष्ठ नेते सीवी शनमुगम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 30 आमदारांनी TVK ला आपलं समर्थन देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय टीटीवी दिनाकरन यांचा पक्ष AMMK चे आमदार कामराज हे सुद्धा विजय यांना पाठिंबा देतील.मुख्यमंत्री विजय यांनी बुधवारी विधानसभेत बहुतम सिद्ध करावं लागणार आहे.

TVK कडे स्वत:च्या 107 जागा आहेत. काँग्रेसचे 5 आमदार, डाव्यापक्षांचे दोन-दोन आमदार, वीसीके, मुस्लिम लीगच्या दोन-दोन जागा यांच्या बळावर विजय यांनी सरकार बनवलं आहे. आता AIADMK चे 30 आमदार सोबत आल्याने विजय यांचं सरकार अजून मजबूत झालं आहे. “माझा पक्ष तोडण्याचा त्यांचा इरादा नाहीय. मी जनतेच्या जनादेशाचा सन्मान करतोय. जनतेने विजय यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मतदान केलं आहे. आम्ही त्या जनादेशाचा सन्मान करतो” असं टीवीकेला समर्थन देण्याच्या मुद्यावर शनमुगम म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group