थलपती विजय यांनी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन केले. तामिळनाडूमध्ये सत्ता हातात आल्यापासूनच थलपती विजय गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. विविध योजना आणल्या जात आहेत.
तामिळनाडू सरकारने सरकारी शाळांमध्ये मुलांना आठवड्यातून एक दिवस चिकन बिर्याणी देण्याची योजना तयार केली. शिक्षण मंत्री राज मोहन यांनी म्हटले की, मुख्यमंत्री जोसेफ विजय ऊर्फ थलपती विजय यांची इच्छा आहे की, शाळेतील मुलांना आठवड्यातून एक दिवस तरी बिर्याणी दिली जावी. यासोबतच विद्यार्थ्यांची संख्या साफसफाई आणि सुरक्षा याकरिता खास योजना आणली जावी.
मंत्री राज मोहन यांनी म्हटले की, सरकारची इच्छा आहे की, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना चिकन बिर्याणीचा पर्याय द्यावा. साफसफाईबद्दल योग्य त्या उपायोजना कराव्यात. आपल्या विद्यार्थ्यांना हे मिळू नये का? ही योजना सुरू करण्यापूर्वी सर्व उपायोजना करणे आवश्यक आहे. त्यानंतर जेवणाची तयारी, स्वच्छता, प्रत्येक सुविधा शाळेपर्यंत पोहोचाव्यात. हा प्रस्ताव पहिल्यांदा जुलै महिन्यात आणला गेला. त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना चिकन बिर्याणी देण्याचा विचार करण्यात आला.
मुख्यमंत्री थलपती विजय यांनी हा प्रस्ताव ठेवला. मुलांना प्रोटीनची आवश्यकता असते. चिकन बिर्याणीच्या मुद्द्याला राजकीय विषय म्हणून बघितले जाऊ नये. ज्या विद्यार्थ्यांना शाकाहारी जेवण पाहिजे, त्यांना शाकाहारी जेवण मिळेल. बिर्याणी ज्या विद्यार्थ्यांना हवी, त्यांना बिर्याणी मिळेल, यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेतच सकाळचा नाश्ता मिळावा, याकरिता सरकार प्रयत्न केली जात आहेत.