मुख्यमंत्री होताच विजय  यांनी घेतला मोठा निर्णय ,  अभिनेत्री त्रिशा कृष्णनची लॉटरी
मुख्यमंत्री होताच विजय यांनी घेतला मोठा निर्णय , अभिनेत्री त्रिशा कृष्णनची लॉटरी
img
दैनिक भ्रमर



थलपती  विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री होताच त्यांनी एक मोठा  निर्णय घेतला असून यामुळे अभिनेत्री त्रिशाला राजकारणात मोठी लॉटरी  लग्नायची शक्यता वर्तविली जात आहे.  पहिल्याच निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवत,थलपती विजय थेट मुख्यमंत्री विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता तामिळनाडूत मोठे बदल होण्याची आशा आहे. अशातच विजय यांची कथित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णनची लॉटरी लागल्याची चर्चा आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी असा एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कदाचित त्रिशाचं नशीब पालटू शकतं. थलपती मुख्यमंत्री झाल्यानंतर त्रिशाचीही राजकारणात एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय दोन जागांवर निवडणूक लढले. एक म्हणजे पेरांबूर मतदारसंघ आणि दुसरा त्रिची पूर्व मतदारसंघ. घटनेनुसार निवडणूक जिंकल्यानंतर 14 दिवसांच्या आत एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी एक जागा सोडली.

दरम्यान,  विजय यांनी पेरांबूर मतदारसंघ आपल्याकडे ठेवला आहे आणि त्रिची पूर्व मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा सचिव के. श्रीनिवासन यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. पेरांबूर हा उत्तर चेन्नईचा एक महत्त्वाचा भाग असून, तो माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा बालेकिल्ला कोलाथूरच्या अगदी जवळ आहे. येथून निवडणूक लढवून, विजय द्रविड राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्यांना थेट आव्हान देऊ शकतो आणि चेन्नईसारख्या शहरी भागात आपली पकड आणखी मजबूत करू शकतो.

त्यामुळे आता त्रिची पूर्व मतदारसंघात येत्या सहा महिन्यांत पोटनिवडणूक होईल. तिथे विजय यांचा तामिळगा वेट्री कळघम पक्ष नवीन उमेदवार उभा करण्याची तयारी करतील. सूत्रांनुसार टीव्हीके या जागेसाठी स्थानिक तळागाळातील कार्यकर्त्याला किंवा तरुण उमेदवाराला उभं करू शकतं. त्रिचीसारख्या महत्त्वाच्या शहरात पक्षाचं प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी विजय आपल्या एका विश्वासू सहकाऱ्याला किंवा पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला उमेदवारी देऊ शकतात. विशेषतः अभिनेत्री त्रिशा कृष्णन किंवा माजी आयएएस अधिकारी यू. सगायम यांची नावं सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group