तामिळनाडूचे CM विजय थलपती आणि त्यांची पत्नी संगीता पुन्हा एकत्र?  पत्नी संगीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतली
तामिळनाडूचे CM विजय थलपती आणि त्यांची पत्नी संगीता पुन्हा एकत्र? पत्नी संगीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतली
img
Nandini khandare More
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीके (TVK) प्रमुख सी. जोसेफ विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. संगीता यांनी चेंगल्पट्टू कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोघांमध्ये समेट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आ

 गेल्या काही महिन्यांपासून दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा होती. परंतू आता संगितायांनी कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर कोर्टाने देखील हे प्रकरण आता संपूर्णपणे बंद केले आहे.

बातम्यानुसार संगिता  यांनी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली, संगिता चेंगलपट्टू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर होत आपला पक्ष ठेवला. त्यांनी जजच्या समोर स्पष्ट केले की त्या आता ही केस पुढे चालवू इच्छीत नाही आणि यामागचे कारण देखील त्यांनी कोर्टाला सांगितले.

कोर्टाच्या अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला की संगिता चेंगलपट्टू यांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने अर्ज मागे घेतल्याचे मानून या प्रकरणाचा निपटारा केला आहे. याच्या आधी १५ जून रोजी स्थानिक कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत पुढील तारीख ७ ऑगस्ट मुक्रर केली होती

दरम्यान , विजय आणि संगिता यांच्या या कायदेशीर लढाईची सुरुवात फेब्रुवारी २०२६ मध्ये झाली होती. जेव्हा संगिता यांनी स्पेशल मॅरेज एक्ट, १९५४ अंतर्गत चेंगलपट्टू कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत त्यांनी या विवाहाला समाप्त करण्याची मागणी केली होती. संगिता यांचे म्हणणे होते की दोघांच्या दरम्यान आता सर्व काही ठिक राहिलेले नाही. आणि हा विवाह संपल्यात जमा झाला आहे. अर्जात संगिता यांनी विजय याच्यावर विवाहबाह्य संबंध, मानसिक छळ, उपेक्षा आणि साथ सोडणे सारखे गंभीर आरोप केले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group