मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांचा घटस्फोट कॅन्सल? नक्की  काय घडतंय ?
मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांचा घटस्फोट कॅन्सल? नक्की काय घडतंय ?
img
दैनिक भ्रमर



थलपती विजय यांनी तामिळनाडूतील राजकरणात मोठी झेप घेतली आहे तर मात्र दुरीकडे  राजकारणात एंट्री झाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं. तामिळनाडू विधानसभा निवडणूक तोंडावर असताना त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगमने त्यांच्यावर गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला.यानंतर विजय त्यांचं नाव त्रिशाची जोडलं. पण आता विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर संगीताशी घटस्फोट कॅन्सल होणार, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

विजय मुख्यमंत्री होण्याआधी घटस्फोटासाठी अर्ज करणारी त्यांची पत्नी संगीताचा विजय सीएम झाल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर या चर्चा रंगत आहेत.लग्नानंतर 27 वर्षांनी संगीताने विजय यांचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला.  संगीता आता यूकेमध्ये आपल्या आईवडिलांसोबत राहते. विजय-संगीता याची मुलं जेसन संजय आणि दिव्या साशाही तिच्यासोबतच यूकेला राहतात.

विजय यांच्या मुख्यंत्रिपदाच्या शपथविधीला पत्नी संगीता येते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण विजय यांचे आईवडील आणि त्रिशा कृष्णनने सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर संगीता यावर सोशल मीडियावर काही पोस्ट करते किंवा कुठे प्रतिक्रिया देते का, याची उत्सुकता होती. पण तसंही झालं नाही.विजय यांच्या मुख्यंत्रिपदाच्या शपथविधीला पत्नी संगीता येते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण विजय यांचे आईवडील आणि त्रिशा कृष्णनने सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर संगीता यावर सोशल मीडियावर काही पोस्ट करते किंवा कुठे प्रतिक्रिया देते का, याची उत्सुकता होती. पण तसंही झालं नाही.

यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत. काहींचं म्हणणं आहे की, जर संगीता इतक्या महत्त्वाच्या दिवशी उपस्थित राहिल्या नाहीत, तर आता त्यांचं एकत्र येणं केवळ अशक्य आहे. त्यांचा घटस्फोट आता नक्की आहे. तर काहीजणांना अशीही आशा आहे की, विजय आता एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. इतकी मोठी जबाबदारी आणि सन्मान मिळाल्यावर संगीता नक्कीच आपलं मन बदलतील आणि पुन्हा तामिळनाडूला परततील.त्यामुळे आता विजय यांच्या आयुष्यात खरंच संगीता पुन्हा येणार की त्रिशाची एंट्री होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group