भारतात पाणीपुरी ही जवळपास प्रत्येकाच्याच अत्यंत आवडीची आहे. लहान मुलांसह तरुणाही आणि वृद्ध देखील याची चवीचे गोडवे गात असते. पण भारतात मिळणारी ही पाणीपुरी अमेरिकेत खूपच महाग आहे. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये पाणीपुरीची विक्री होत आहे. पाणीपुरीचे किऑस्क आता अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत. याशिवाय अमेरिकेतील काही रेस्टॉरंट्समध्येही पाणीपुरी मिळत आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत शेअर करत आहेत, त्यानुसार अमेरिकेत पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ७ ते १० डॉलरच्या दरम्यान आहे.
अमेरिकेत पाणीपुरीची किंमत काय?
अमेरिकेत पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ७ ते १० डॉलर्स म्हणजेच रुपयांत पाहायचं झाल्यास ६०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. पाणीपुरीच्या एका प्लेटमध्ये ६ ते ८ पाणीपुरी दिल्या जातात. यासोबतच अमेरिकेतील दुकानांमध्ये पाणीपुरीचे एक पॅकेट देखील उपलब्ध आहे. या पॅकेटमध्ये ५० पाणीपुरी आणि मसाला मिळतो. या पॅकेटची किंमत सुमारे ५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ४०० रुपये इतकी आहे.