अमेरिकेतील मिनियापोलिसमधील बुधवार एका शाळेत रोजप्रमाणे नव्हता. सकाळी प्रार्थना सुरु झाली मात्र ती संपण्याआधीच एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एका २० वर्षीय माथेफिरू बंदुकधारीने अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन मुलांचा मृत्यू झाला. तर, १७ लोक जखमी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत गोळीबार केल्यानंतर बंदुकधारीने स्वत:वर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेली दोन्ही निष्पाप मुले ८ आणि १० वर्षांची आहेत.
हे ही वाचा
संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस प्रमुखांनी सांगितले की, गोळीबार करणारा व्यक्ती चर्चजवळील शाळेजवळ आला. नंतर चर्चच्या खिडकीच्या आत रायफलमधून गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.'दु:खद घटना अतिशय भयानक आहे.
हे ही वाचा
गोळीबाराबाबत माहिती मिळाली. व्हाईट हाऊस या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे', असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले.