फार्मसीला प्रवेश घेताय ? थांबा ! 'ही' बातमी वाचा... राज्यातील १७५ फार्मसी महाविद्यालयांना ’कारणे दाखवा’ नोटीस
फार्मसीला प्रवेश घेताय ? थांबा ! 'ही' बातमी वाचा... राज्यातील १७५ फार्मसी महाविद्यालयांना ’कारणे दाखवा’ नोटीस
img
वैष्णवी सांगळे
शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविणार्‍या संस्थांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत आवश्यक निकष पूर्तता न केलेल्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संबंधित संस्थांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेताना काळजी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा 
शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, 'हा' गंभीर आरोप

राज्यातील औषधनिर्माणशास्त्र संस्थांची तपासणी केल्यानंतर डिप्लोमाच्या १२८ तर डिग्रीच्या ४८ महाविद्यालयांनी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषांची पूर्तता केली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय यंदाची प्रवेशप्रक्रिया राबविता येणार नसल्याचे ’तंत्रशिक्षण संचालनालया’चे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित संस्थांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 

हे ही वाचा 
लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, वंचित बहुजन आघाडीचा नेता ताब्यात

करोनाकाळात राज्यातील फार्मसी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक नव्या संस्थांनी मान्यतेसाठी पीसीआयकडे अर्ज पाठवले होते. गेल्या तीन वर्षांत पीसीआयने डिप्लोमाच्या २२० आणि पदवीच्या ९२ नव्या महाविद्यालयांना परवानगी दिली. या महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या प्रवेशांची संख्या घटत असूनही दरवर्षी नवनवीन महाविद्यालयांना परवानगी देण्यात येत असल्याने या संस्था सर्व निकष पूर्ण करतात का, हे तपासण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे या संस्थांची झाडाझडती घेत पाहणी केली. 

हे ही वाचा 
परवानगी फक्त एक दिवसाची ! ... तर राजकीय करिअर बर्बाद करणारी लाट येईल, मनोज जरांगेचा इशारा

या पाहणीत पदविका अभ्यासक्रमाच्या जवळपास ६० टक्के संस्था पात्रतेचे निकषच पूर्ण करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. यात अग्निसुरक्षा प्रमाणपत्रच न घेणे, भोगवटा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळांची संख्या कमी असणे, पीसीआयच्या निकषांपेक्षा कमी कर्मचारी संख्या असणे अशा अनेक गोष्टी आढळून आल्या. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group