Apple ने डोनाल्ड ट्रम्पना दिला मोठा झटका, घेतला 'हा' मोठा निर्णय
Apple ने डोनाल्ड ट्रम्पना दिला मोठा झटका, घेतला 'हा' मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर :  गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विरोधात एक ना एक कठोर पाऊल उचलत आहे. पण प्रत्यक्षात अमेरिकेत त्यांचं कोणी ऐकत नसल्याच दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनांना अमेरिकन कंपन्या किंमत देत नाही असं साधारण दिसून येत आहे कारण मध्यंतरी ट्रम्प यांनी जगप्रसिद्ध कंपनी Apple ला चीन, भारताऐवजी अमेरिकेत उत्पादन प्लान्ट टाकायला सांगितला होता. पण Apple ने ट्रम्प यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याच दिसत आहे. Apple ने पुन्हा एकदा चीन आणि अमेरिका यांचा दबाव झुगारुन भारतात आपलं iPhone च प्रोडक्शन वाढवलं आहे.

iPhone च उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉनने बंगळुरु जवळच्या नव्या प्लान्टमध्ये iPhone-17 च उत्पादन सुरु केले आहे.  फॉक्सकॉनचा भारतातील हा दुसरा प्लान्ट आहे. CNBC च्या एक रिपोर्टनुसार फॉक्सकॉनने बंगळुरुच्या देवनहल्ली येथे जवळपास 2.8 अब्ज डॉलरची (25,000 कोटी रुपये) मोठी गुंतवणूक करुन प्लांट सुरु केला आहे. सध्या iPhone-17 उत्पादन छोट्या प्रमाणात सुरु केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज टेक कंपनी Apple ला भारतात उत्पादन बंद करायला सांगितलं होतं. पण कंपनीने भारतात उत्पादन वाढवलं आहे. Apple चे सीईओ टिम कुक म्हणाले की, 'अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश iphone भारतातून आयात केले जातील' भारताला प्रोडक्शन हब बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाच पाऊल आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात iPhone च उत्पादन सहाकोटी युनिटपर्यंत वाढवण्याची Apple ने आधीच घोषणा केली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group