आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना युट्यूबने मोठा धक्का दिला आहे, युट्यूबने एक नवीन अपडेट आणलंय.
यानुसार काही ठराविक वापरकर्त्यांसाठी युट्यूब ॲप सपोर्ट बंद करण्यात आला आहे. कोणत्या मॉडेल्ससाठी सपोर्ट बंद करण्यात आला आहे. तुमच्या फोनवर युट्यूब ॲप चालणार की नाही? यासंदर्भात आपण जाणून घेऊ या.
अलीकडेच युट्युबनेॲप चं नवीन व्हर्जन (20.22.1) आणलं आहे. या नवीन आवृत्तीमुळे जुन्या आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी युट्युब ॲप चा सपोर्ट बंद करण्यात आला आहे. युट्युबची नवीन आवृत्ती iOS 16 आणि त्यावरील मॉडेल्सना सपोर्ट करेल. याचा अर्थ असा की, जर तुमचा आयफोन किंवा आयपॅड iOS 15 वर काम करत असेल, तर आता तुम्ही फोनवर युट्युब ॲप चालवू शकणार नाही.
युट्युब कोणत्या मॉडेल्सवर चालणार नाही?
YouTube च्या नवीन अपडेटनंतर, हे ॲप खाली नमूद केलेल्या iPhone आणि iPad मॉडेल्सना सपोर्ट करणार नाही. अर्थात, YouTube ॲप खाली नमूद केलेल्या मॉडेल्सना सपोर्ट करणार नाही, परंतु वापरकर्ते मोबाइल ब्राउझरद्वारे YouTube ॲक्सेस करू शकतील. ब्राउझरद्वारे वापरले गेल्यास ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या स्मूथ नेव्हिगेशन, ऑफलाइन सपोर्ट आणि चांगले व्हिडिओ स्ट्रीमिंग टूल्स इत्यादी वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकणार नाही.
आयफोन 6 एस प्लस
आयफोन 6 एस
आयफोन 7 प्लस
आयफोन 7
आयपॉड टच (7th Generation)
आयफोन एसई (1st Generation)
आयपॅड मिनी 4
आयपॅड एअर 4
एखाद्या अॅपने जुन्या मॉडेल्सना सपोर्ट करणे बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर व्हॉट्सॲपने जुन्या व्हर्जनना सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सना सपोर्ट करणे देखील थांबवले आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, डेव्हलपर्स अधिक प्रगत सॉफ्टवेअरसह येणाऱ्या नवीन डिव्हाइसेसवर लक्ष केंद्रित करत आहेत.