जिओचा मोठा धमाका...! मुकेश अंबानी यांनी वाढवलं Apple, Google चं टेन्शन...वाचा
जिओचा मोठा धमाका...! मुकेश अंबानी यांनी वाढवलं Apple, Google चं टेन्शन...वाचा
img
Dipali Ghadwaje
रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे ॲपल आणि गुगलचे ही टेन्शन वाढले असून मायक्रोसॉफ्टला ही चिंता तावतेय. रिलायन्स जिओ आता आपल्या ग्राहकांना 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज देणार आहे. त्यामुळेच Google One आणि iCloud च्या वर्चस्वाला अंबानी यांनी थेट आव्हान दिले आहे.

आतापर्यंत क्लाउड स्टोरेजवर फक्त गुगल आणि ॲपलचेच वर्चस्व होते. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या वनड्राईव्हचाही समावेश होता. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसाठी जिओचे हे मोठे आव्हान असणार आहे. कारण येत्या काळात यामुळे बाजारात मोठे बदल दिसून येणार आहेत.

जिओने बाजारात एन्ट्री करताच अनेक लहान कंपन्या बंद झाल्या आहेत. कारण त्या जिओसोबत स्पर्धाच करु शकल्या नाहीत. दुसरीकडे आता Google One मध्ये 100 GB स्टोरेज खरेदी करण्यासाठी 130 रुपये द्यावे लागतात, तर Apple iCloud मध्ये 50 GB साठी 75 रुपये द्यावे लागतात. असं असताना मुकेश अंबानी यांनी क्लाउड सेवा सुरू करण्याची घोषणा केल्याने हा त्यांचा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटले जात आहे.

जिओच्या या निर्णयाचा मोठा फायदा यूजर्सना होणार आहे. कारण आतापर्यंत अशी सेवा कोणत्याही भारतीय कंपनीकडून दिली जात नव्हती. जर 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज दिले तर युजर त्याचा भरपूर वापर करु शकणार आहेत. दुसरं म्हणजे जिओची सशुल्क सेवाही खूप स्वस्त असेल, यामुळे गुगल आणि ॲपललाही आता विचार करायला भाग पडेल की ते आपले वर्चस्व कसे कायम राखू शकतील.

 Jio आपल्या ग्राहकांना दिवाळीपासून ही खास ऑफर देणार आहे. युजर क्लाउड स्टोरेजमध्ये काहीही सेव्ह करुन ठेवू शकता. जसे की फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि इतर डिजिटल सामग्रीचा समावेश असेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group