आता मुकेश अंबानी नाही तर 'हे' आहेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
आता मुकेश अंबानी नाही तर 'हे' आहेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
img
वैष्णवी सांगळे
ब्लूमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. त्यांनी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना श्रीमंतीत मागे टाकले आहे. सध्या जगातील श्रीमंतात अदानी यांचा 19 वा क्रमांक आहे. Hindenburg Research अहवालानंतर जागतिक क्रमवारीतून ते बाद झाले होते. त्यांनी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. 



मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील दोन दिग्गज उद्योगपती आहेत. दोघांमध्ये नेहमी श्रीमंतीच्या बाबतीत स्पर्धा सुरू असते. अशातच आता श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 90.8 अब्ज डॉलर इतकी आहे. संपत्तीतील या वाढीमुळे अदानी आता केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अलीकडे मोठी वाढ दिसून आली आहे. बंदरे, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) क्षेत्रांमधील कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. याच कारणामुळे अदानी समूहाच्या बाजारमूल्यात अब्जावधी डॉलरची वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम अदानी यांच्या संपत्तीत दिसून आला आहे. यात कारणामुळे अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group