उद्योगपती  मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकी, 200 कोटीनंतर आता
उद्योगपती मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकी, 200 कोटीनंतर आता "इतक्या" कोटींची मागणी
img
Dipali Ghadwaje
उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांना आठवडाभरात तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने अंबानींकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. 

याबात सविस्तर माहिती अशी की, काल सोमवार ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकी देणारा आणि या रकमेची मागणी करणारा एक मेल आला. याआधीही अंबानी यांना सलग दोनदा अशाच धमक्या आल्या होत्या, मात्र त्यानंतर कमी रकमेची मागणी करण्यात आली होती. 

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही धमकी त्याच अज्ञात व्यक्तीने दिली आहे, ज्याने 27 ऑक्टोबर रोजी दोन ईमेल पाठवून 200 कोटी रुपयांची मागणी केली होती. तिसर्‍या ईमेलमध्ये, त्या व्यक्तीने खंडणीची रक्कम वाढवून 400 कोटी रुपये केली आहे कारण अंबानींनी त्यांच्या मागील दोन ईमेलला उत्तर दिले नव्हते.

या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सोमवारी अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) सुरक्षा वाढवली आहे. पहिला धमकीचा ईमेल 26 ऑक्टोबरला आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर त्याची किंमत 200 कोटी रुपये करण्यात आली. पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही धमकीच्या मेलमध्ये म्हणले आहे.

अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवलेल्या तिसऱ्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, ''तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत 400 कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत.''
इतर बातम्या
Join Whatsapp Group