उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू
उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू
img
DB
उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि जर पैसे दिले नाहीत तर अंबानी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता. धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिले होते की, “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत”.

दरम्यान हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती.

मुकेश अंबानींची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती, तर नीता अंबानींना Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे. तसेच सीआरपीएफ ही अंबानी कुटुंबाच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group