संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा होत असतात. कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम या खात्यात जमा केली जाते. तेवढीच रक्कम नियोक्तादेखील कर्मचाऱ्याच्या अकाउंटला जमा करत असते. यातील काही पैसे तुमच्या पेन्शनसाठी दिले जातात. तर आता पीएफ अकाउंटसाठी नवीन नियम लागू केले जाई शकतात.
ईपीएफओमध्ये कोट्यवधी कर्मचारी आहेत. ईपीएफओ लवकरच एक नवीन नियम लागू करणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो. सरकारी लवकरच कर्मचाऱ्यांसाठी ३.०ची घोषणा करु शकते.
यामध्ये ईपीएफओ अकाउंटच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के योगदान देण्याची मर्यादा हटवली जाऊ शकते.कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार जेवढे हवे तेवढे योगदान देऊ शकते. त्याचसोबत ईपीएफमधील पैसे एटीएममधून काढण्याचीही सुविधा दिली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओ ३.० आणण्यासाठी तयारी सुरु आहे. ज्यात ईपीएफ सदस्यांसाठी अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. यात ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्यांच्या योगदानाची मर्यादा वाढवली जाऊ शकते. यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कर्मचारी जास्तीत जास्त गुंतवणूक करु शकणार आहेत. यामध्ये कर्मचारी त्यांना हवी तितकी रक्कम पीएफ खात्यात जमा करु शकतात. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांना जास्त पैसे मिळू शकतात.
ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे
ईपीएफ सदस्यांना एटीएम दिले जाऊ शकते. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे इतर कोणत्याही प्रोसेस करण्याची गरज नाही. EPFO 3.0 योजना २०२५ मध्ये लागू केली जाऊ शकते.