पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने अविनाश भोसले यांना जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अविनाश भोसले हे जवळपास दोन वर्षापासून कोठडीत आहेत. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणात २६ मे रोजी त्यांनी पहिल्यांदा सीबीआयनं अटक केली होती. चुकीच्या पद्धतीनं काही कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे.
तर दुसरीकडं मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून देखील त्यांचा तपास सुरु आहे.सीबीआयच्या एका खटल्यात त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. पण आणखी एका प्रकरणात त्यांना जामीन होणं बाकी आहे.
साधारण वर्षभरापूर्वी अविनाश भोसले यांनी हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. पण हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर आज त्यांना सीबीआयच्या प्रकरणात हायकोर्टानं जामीन मंजूर केला. पण अद्याप ईडीच्या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला नसल्यानं त्यांची तुरुंगातून सुटका होतेय की नाही हे पाहावं महत्वाचं ठरेल.