राजकीय बातमी : ठाकरेंच्या
राजकीय बातमी : ठाकरेंच्या "त्या" खासदाराच्या अडचणी वाढणार? समोर आलं मोठं कारण
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले. एक लोकसभा मतदारसंघ अगदी ठाकरेंच्या हातून थोडक्यात निसटला. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल किर्तीकर , तर शिंदेंकडून रवींद्र वायकर अशी लढत होती, अगदी चुरशीच्या निकालात शिंदेंनी मतदारसंघ बळकावला.

या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. अशातच आता ठाकरेंच्या निवडून आलेल्या खासदाराच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.  निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे. 

शहाजी थोरात यांनी संजय दिना-पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. याप्रकरणी मिहीर कोटेंचा यांच्यासह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय? 

लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना-पाटील निवडून आले. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठानं या निवडणूक याचिकेची दखल घेऊन पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅक्सी चालक असलेले आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार शहाजी थोरात यांनी निवडणूक याचिकेद्वारे पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचं नाव नमूद करणं अनिवार्य आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईचं नाव नमूद केलं नव्हतं. नियमानुसार, या कारणास्तव पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरतो. त्यामुळे, त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे संजय दीना-पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 29 हजार 800 मतांच्या फरकानं पराभव केला होता. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. उद्धव ठाकरे गटाचे संजय दीना-पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 29,800 मतांच्या फरकानं पराभव केला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group